Sunday, April 1, 2012

कवडसे.

खुळ्या उन्हाचे
खुळे कवडसे 
पुसून गेले
जुने आरसे
 
जुने आरसे
त्यांच्या संगे 
गत जन्मीचे
मंद उसासे
 

मंद उसासे
त्यात जरासे 
तुझ्या स्मृतींचे
गंध ठसे
 
गंध ठसे
जे वारा नेई 
हळूच हलवून
गवत पिसे
 

गवत पिसे
त्या वारी अचानक 
नकळत उमले
फूल कसे
 
फूल कसे
ते बघून तुजला 
जरा लाजुनी
खुळे हसे
 

खुळे हसे
फूल फसे
निसटून जाती
....कवडसे.

विभोर ह्या माझ्या music album मधलं मिलिंद जोशी नी संगीत दिलेलं आणि चैतन्या नी गायलेलं हे गाण.
#available on CD (fountain music)